वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं. ठाकरेंचं फायनल झालं की घोषणा होईल, असं आंबेडकर यांनी म्हंटलं. तसेच 'मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत बोलत नाही. त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं', असंही त्यांनी म्हंटलं.
#PrakashAmbedkar #UddhavThackeray #Shivsena #VBA #Congress #NCP #Shivshakti #Bhimshakti #Politics #MVA #MahavikasAghadi #Maharashtra